नवी दिल्ली, गुरूवार, 5 नोव्हेंबर 2009( 14:42 IST )
कोरियात सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रकाश अमृतराजने लॅटवियाच्या अँडीस जुस्का याचा 6-1, 2-6, 7-6 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सामन्यात प्रकाशने पहिला सेट सहज चांगली सुरवात केली होती. मात्र दुसर्या सेटमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरनिर्णायक सेटमध्ये प्रकाशने टायब्रेकरमध्ये बाजी मारून विजय मिळविला. दरम्यान, दुहेरीत भारताच्या पुरव राजाने सादिक कादिरच्या साथीत ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग जॉस आणि झेक प्रजासत्ताकच्या पॉवेल स्नोबेल जोडीचा 6-3, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.