क्रीडा वृत्त | ओळख खेळाडूंची | लेख
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » इतर खेळ » क्रीडा वृत्त » राष्ट्रकुलचा बजेट दुप्पट
Feedback Print Bookmark and Share
 
नवी दिल्लीत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेचा बजेट दुप्पट झाला आहे. यापूर्वी 767 कोटी रुपयांचा असलेला बजेट आता 1620 कोटी रुपयांवर गेला आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रकुलच्या वाढीव बजेटला मंजुरी देण्यात आली.

वाढीव अर्थसंकल्प सरकारी व्याजदरांवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सुरक्षा, पर्यावरण, उदघाटन आणि समारोप समारंभसह आदी कारणांमुळे स्पर्धेचा बजेट वाढला असल्याचे माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले. स्पर्धेतून आयोजन समितीस 1708 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
संबंधित माहिती शोधा