लखनौत 16 नोव्हेंबर पासून सुरु होणार्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी 11 नोव्हेंबर रोजी संघ निवड होणार आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे संघ निवडण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे सहसचिव अरुण बनर्जी यांनी दिली.
सिलीगुडीत उत्तर विभागाची स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा संपल्यावर आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. भारताचे दहा पुरुष आणि दहा महिला खेळाडू चीनमध्ये प्रशिक्षण घेऊन आले आहे. यामुळे या खेळाडूंचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.