भारतीय महिला संघाने 'अ'गटातील मलेशियाला १-१ असे बरोबरीत रोखत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक दिली आहे.
उपांत्यफेरीत भारताचा सामना ब गटातील अव्वल संघ दक्षिण कोरियाशी आहे, तर चीनची जपानशी लढत होणार आहे. डिपेंडर बिनीता टोप्पोने २७ व्या मिनिटाला गोल करीत भारताला बरोबरी साधून दिली. यापूर्वी ज्युलियानी मोहम्मद दिनने चवथ्याच मिनिटाला गोल करीत मलेशियाला आघाडी मिळवून दिली होती. दोन विजय आणि एका बरोबरीसह भारताने गटात दुसरे स्थान पटकावले. भारतीय संघ गटात अव्वल राहिला असता तर संघाला आणखी लाभ मिळाला असता, कारण त्यांचा सामना कमकुवत जपानशी झाला असता; मात्र आता संघाचा सामना ब गटातील अव्वल दक्षिण कोरियाशी होणार आहे.