स्वीत्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने स्विस इनडोअर टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. दुसर्या फेरीच्या सामन्यात फेडररने आंद्रेस सेप्पीवर ६-३,६-३ अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अव्वल मानांकित फेडररने बेसलधील सतराव्या विजयाची नोंद केली. गेल्या तीन वर्षांमध्ये या स्पर्धेत फेडरर पराभूत झालेला नाही. पहिला सेट जिंकून फेडररने चांगली सुरुवात केली. त्यानंतर दुसर्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केल्याने हा सेट चुरशीचा झाला. दुसर्या सेटमध्ये सरशी साधत फेडररने उपांत्यपूर्व फेरी गाठली.