आशियाई स्पर्धेत बॉस्केटबॉलमध्ये रजतपदक

हनोई, व्हिएतनाम, शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2009( 17:07 IST )
आशियाई इंडोर क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉस्केटबॉल महिला संघाने चांगली कामगिरी करीत रजत पदक मिळविले. स्पर्धेत भारतीय महिलांना थ्री ऑन थ्री गटात दुसरे स्थान मिळाले.
पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत उपात्यंफेरीत भारताने बांगलादेशचा 59.18 असा पराभव करीत आपले पदक निश्चित केले. अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना इराणशी होणार आहे.